सोयगाव प्रतिनिधी. रईस शेख
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सपोनि भरत मोरे फर्दापूर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमेटीची बैठक घेण्यात आली.विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गावात कोणत्याही प्रकारचा बाधा निर्माण होऊ नये याकरिता काय खबरदारी घ्यावी असे मार्गदर्शन सपोनि भरत मोरे यांनी केले.मार्गदर्शन करून पुढे म्हणाले पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन सपोनि भरत मोरे यांनी केले. उत्सव काळात कोणीही आक्षेपार्ह पोस्टरर्स लावणार नाही. घोषणा देणार नाही, अशा सूचना केल्या.गावातील सामाजिक सलोख्याची भावना कायम राहून धार्मिक एकोपा टिकावा याकरीता सर्व धर्मियांनी सहकार्य करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श विचार लोकांनी अंगीकारावे अशी उपस्थितांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे सामाजिक एकोप्याची परंपरा यापुढेही टिकवून ठेवून येणारे सर्व राष्ट्रीय सण एकात्मतेच्या भावनेतून व शांततेत पार पाडतील यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
शांतता कमेटीच्या वेळी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मंडळाचे सदस्य, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष मनोहर जगताप सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर सुरडकर, भगवान जाधव,मोहन सुरडकर,सुदाम जाधव सर पोलीस मित्र आणि पोलीस पाटील विलास कुल्ले,बिट जमादार मिरखाॉ तडवी, शिवदास गोपाळ व पत्रकार बंन्धू आदी उपस्थित होते.विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ जयंती सर्व समाजबांधव मोठया उत्साहात दरवर्षी साजरी करतात. यानिमित्त सावळदबारा परिसरात ठिकठिकाणी मिरवणुकीचे आयोजन केले जाते. या महत्वपूर्ण दिवसाला असे कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी सपोनि भरत मोरे फर्दापूर पोलिस स्टेशन यांनी शांतता कमिटीची बैठक घेतली.
सावळदबारा परिसरात सर्व ठिकाणी निघणान्या मिरवणुकी शांततेत निघेल. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही,याची समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी. यावेळी उपसरपंच मो.आरिफ मो.लुखमान,मोहन सुरडकर,सुरडकर,संदीप सूर्यवंशी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.