उदगीर, श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर येथील मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉ सुशिलप्रकाश चिमोरे, योगगुरु रामचंद्र गरड, प्रल्हाद येवरीकर हे उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करुन करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ सुशिलप्रकाश चिमोरे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन आपले शिक्षण पूर्ण केले. माणसाला माणूस म्हणून जगायला शिकविणारे, गुलाम म्हणून न जगता स्वाभिमानाने जगायला शिकवणारे , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट ही पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते.
अध्यक्षिय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान बुद्ध, संत कबीर व महात्मा फुले यांना गुरु मानले होते. पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातले पहिले सत्याग्रही होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुणे यांचा परिचय प्रल्हाद येवरीकर यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख बालाजी मुस्कावाड यांनी केले तर आभार इतिहास विभाग प्रमुख उमाकांत नादरगे यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील महिंद्रकर, गणित विभागाचे प्रमुख संतोष चामले, प्रा. शिवाण्णा गंदगे, धनराज काटू, नागेश पंगू, सर्व हाऊस मास्टर यांनी परिश्रम घेतले.