बाबुळ दे गावठाण शिवारातील ट्रान्सफॉर्मर गेल्या वीस पंचवीस दिवसापासून जळून बंद होता माता भगिनींच्या पिण्याच्या पाण्याची प्रचंड तीव्रता निर्माण झाली होती.
अशावेळी देव दुधाच्या रुपाने इंजिनियर मोहन सूर्यवंशी हे धावून आले. रावसाहेबांना ग्रामस्थांनी ट्रांसफार्मर बसवून देण्यासाठी विनंती केली. आणि लगेच रावसाहेबांनी 24 तासाच्या आत ट्रांसफार्मर उपलब्ध करून दिला. "जो जैसा बोले तैसा चाली त्याची वंदावी पाऊले" या म्हणी प्रमाणे बाभूळदेगावातील ग्रामस्थांनी ट्रांसफार्मर उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष श्री बिंदू शेठ शर्मा, व श्री इंजिनिअर मोहनराव साहेब सूर्यवंशी यांचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.