मालेगाव. प्रतिनिधी,
येथील सुप्रसिध्द राष्ट्रीय कवी, लेखक व समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते संजय मुकूंद निकम मालेगाव.यांना महिला व अनाथ मुलांसाठी व मुलींसाठी , वयोवृद्ध व्यक्ती साठी केलेल्या कार्याची दखल घेऊन श्री सत्य इंदिरा फाउंडेशन ,जयपूर राजस्थान ह्या राष्ट्रीय संस्थेने त्यांचा यथोचित सत्कार केला,
श्री सत्य इंदिरा फाउंडेशन जयपुर राजस्थान संस्थेचया वतीने राष्ट्रीय कवि संजय मुकूंदराव निकम मालेगांव,श्री महिपाल सिंह वीजारनियां, हरियाणा,ईयाद युसूफ अल नजार,पैलसटाईन, श्री नागेश चिमरोल, कर्नाटक आदि विशेष मान्य वरांचा आंतरराष्ट्रीय महिला सशक्तिकरण सम्मान ,वर्ष 2023 देवून विशेष सन्मान करण्यात आला .या कार्यक्रमास देशभरातील विविध संस्था व पदाधिकारी सर्व स्तरातील ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते, उपस्थित होते.