रावेर तालुक्यातील खिर्डी येथे इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्यात येथील मस्जिद ठिकाणी इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले.या इफ्तार पार्टीचे चे आयोजन प्रा संजय मोरे अण्णा मानव अधिकार आतंरराष्ट्रीय फेडरेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव
यांच्या सह सहकार्य मंडळी यांनी केले होते. या दरम्यान प्रेषित मोहम्मद यांचे मानवतेचे विचार प्रत्येकाने आपापल्या जीवनात अनावे तसेच त्यांनी सांगितलेले मानवतेच्या मार्गावर चालणे सध्या काळाची गरज आहे असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले
इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक स्तंभ म्हणजे रोजा. आणि, मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र मानला जाणारा महिना म्हणजे रमजान. इस्लामिक कॅलेंडरच्या नवव्या महिन्यापासून, म्हणजेच या वर्षीच्या २५ मार्चपासून, रमजानला सुरुवात झाली आहे. या महिन्यात उपवास, सत्कर्म आणि अल्लाहची उपासना, या गोष्टींना विशेष महत्त्व दिले जाते.या ठिकाणी प्रल्हाद बोंडे (मानव अधिकार आतंरराष्ट्रीय फेडरेशन जळगाव जिल्हा अध्यक्ष),बाळा साहेब शिरतुरे (मानव अधिकार आतंरराष्ट्रीय फेडरेशन युवक जळगाव जिल्हा अध्यक्ष),किसन महाजन (मानव अधिकार आतंरराष्ट्रीय फेडरेशन जिल्हा सल्लागार), मस्जिद अध्यक्ष शेख असलम, झाकीर पिंजारी, खिर्डी खुर्द ग्रापंचायत सदस्य अल्ताब बेग, साबीर बेग, शेख इमरान,फारुक शेख,शेख कय्युम, शेख सलमान,शेख शब्बीर,रफिक बेग, तुकडू बेग, याकूब बेग, शेख फारुक इसाक आदी सह उपस्थित होते.मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याबद्दल प्रा संजय मोरे व सहकार्याचे शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कर करण्यात आले.