संगीता मोतीपवळे सार्वजनिक वाचनालयात महात्मा फुले जयंती साजरी


उदगीर(प्रतिनिधी)

शिवनगर नवीन वसाहत एसटी कॉलनी मलकापूर येथील संगीता मोतीपवळे सार्वजनिक वाचनालयात थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

ज्येष्ठ नागरिक बाबुराव भोसले यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेश तोडकर ,अशोक कप्ते, दिगंबर बिरादार, संतप्पा हुरदळे, विजय बैले, विश्वनाथ स्वामी वाचनालयाचे सचिव राम मोतीपवळे ईत्यादी उपस्थित होते.