कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ जागांसाठी मतदान

 


येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ जागांसाठी झालेले मतदान अतिशय शांततेत पार पडले. माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ, ज्येष्ठ नेते माजी आमदार मारोतराव पवार ,अंबादास बनकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनल व ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे ,स्थानिक स्वराज्य संस्थेतील आमदार नरेंद्र दराडे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी समर्थ पॅनल यांच्यामध्ये चुरशीची लढत होती..दोन्ही बाजूच्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत अखेरच्या क्षणापर्यंत मतदार राजाला आपल्या बाजूने शर्थीचे प्रयत्न केले..

सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदार पेटीत बंद झालेले असून उद्या मतदार राजा आपला कौल कोणाला देतो हे कळून येईल..

झालेले एकूण मतदान

१) सोसायटी मतदार संघ : १०४८ पैकी १०३६

२) ग्रामपंचायत मतदार संघ : ८३४ पैकी ८३२

३) व्यापारी व आडते मतदार संघ : ४२३ पैकी ४०२

४) हमाल व तोलारी मतदारसंघ : ३५३ पैकी ३४७

एकूण झालेले मतदान :  २६५८ पैकी २६१७ झालेल्या मतदानाची टक्केवारी : ९८.४५   टक्के