महापुरुषांची चरित्रे लहान वयातच मुलांना वाचण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत--पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मेटापल्ली



किरण माने इंदापूर प्रतिनिधी

    (२४ एप्रिल शेळगाव) जे.के. क्रीडा प्रबोधिनी आयोजित खो-खो व मैदानी खेळांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराच्या सातव्या दिवशी दुपारच्या सत्रामध्ये सर्व खेळाडूंना आरोग्य विषयक व आहार विषयक मार्गदर्शन शेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ.प्रणाली भजगवळी यांनी केले. सुदृढ आरोग्यासाठी व सध्याच्या काळामध्ये उष्माघाताच्या आजारापासून वाचण्यासाठी भरपूर पाणी पिणे,त्याचबरोबर सकस आहार घेणे व त्या संदर्भात सर्वांचे जनजागृती करणे, या विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शन डॉ.प्रणाली भजगवळी यांनी केले.

      तसेच संध्याकाळच्या सत्रामध्ये वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मेटापल्ली यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक व करिअर विषयक मार्गदर्शन,जीवनात खेळाचे महत्व तसेच कायद्याचे पालन याविषयी अनमोल मार्गदर्शन केले. महापुरुषांची चरित्रे लहान वयातच मुलांना वाचण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत , अशी इच्छा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. मुलांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्याचा म्हणते त्यांनी यावेळी व्यक्त केले.

      या कार्यक्रमासाठी पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मेटापल्ली,डॉ.प्रणाली भजगवळी, ह.भ.प अनिल महाराज जाधव, पोपट ननवरे,मनोहर जाधव,वसंत शिंगाडे, परशुराम मोहिते गुरुजी, उमेश सुपुते गुरुजी,महेश खराडे,बबलू निंबाळकर, उमेश ननवरे,प्रशांत भुजबळ,दत्ता साळवे,मारुती पोंदकुले,प्रबोधनीचे प्रशिक्षक कैलास जाधव,तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, खेळाडू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.