अंदोलन यशस्वी होण्यासाठी प्रत्यक्ष संपात सहभागी झाल्याबद्दल केंद्रात शिक्षक सेना पदाधिकारी यांचा सत्कार

     राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील जुनी पेन्शन संघटनेच्या पदाधिकारी यांनी पुकारलेल्या बेमुदत अंदोलनास(दि.7/3/2023 ते14/3/2023) सक्रीय पाठींबा देऊन अंदोलन यशस्वी होण्यासाठी प्रत्यक्ष संपात सहभागी झाल्याबद्दल सर्व संघटनेच्या पदाधिकारी यांचा जुनी पेन्शन संघटना त्रंबकेश्वर शाखेच्या वतीनं आभार अभियान राबवत पेढे भरवत तसेच पुष्पगुच्छ देऊन आभार मानले माळेगाव केंद्रात शिक्षक सेना पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक सेना उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस बबनराव चव्हाण, ता. उपाध्यक्ष  धनंजय गोसावी उपस्थित होते. सदर अभियान यशस्वी होण्यासाठी त्रंबकेश्वर जुनी पेन्शन संघटना अध्यक्ष दिलीप बेंडकोळी, किसन दडस,अजित जथे, नारायण शिंदे अदींनी पुढाकार घेतला