प्राथमिक शिक्षक समितीकडून शिक्षण आयुक्तांना निवेदन



सतीश कोळी,शहर प्रतिनिधी खुलताबाद 

दि.१९ राज्याचे शिक्षण आयुक्त मा. सूरजजी मांढरे साहेब यांची बुधवारी दि. १९ एप्रिल रोजी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, वर्धा यांचे कार्यालयात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सदिच्छा भेट घेऊन सन्मानीत करण्यात आले. त्यावेळी अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक मा. डॉ. शिवलिंग पटवे साहेब, नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक मा. डॉ. वैशाली जामदार मॅडम, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) मा. सचिन जगताप साहेब उपस्थित होते, असे शिक्षक समिती छत्रपती संभाजी नगरचे जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी यांनी सांगितले. 

   महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या वतीने राज्याध्यक्ष विजय कोंबे, वर्धा जिल्हा उपाध्यक्ष अतुल उडदे, सेलू तालुका सचिव सुदेश खोब्रागडे यांनी मा‌ आयुक्त साहेबांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनातील मुद्यांवर सकारात्मक विचार केला जाईल असे मा. महोदयांनी आश्वस्त केल्याचे शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी कळविले आहे.