प्रतिनिधी सुरज पुरारकर
तळा- गेले काही वर्ष तळा तालुक्याचे आसलेल तहसीलदार ए. एम. कनशेट्टी यांची नुकती बदली झाल्याने त्याचा जागी नवीन तहसीलदार पदी स्वाती पाटील यांनी आपला पदभार स्वीकारला.
तहसीलदार झोपडपट्टी व पुनर्वसन प्राधिकरण पिंपरी चिंचवड क्षेत्र व पुणे तहसीलदार पदी आसलेल्या स्वाती पाटील यांची नुकतीच तळा तहसीलदार पदी शासनाने नियुक्ती केली असून स्वाती पाटील यांनी सोमवार 17एप्रिल 2023रोजी आपल्या पदाचा कार्यभार हाती घेऊन तहसील कामकाजाला सुरुवात केली आहे. अतिशय उत्तम अभ्यासु आणि दांडगा अनुभव तसेच चेहरा हसरा आसलेल्या तहसीलदार तळा सारख्या डोंगराळ व अती दुर्गम कोणताही रोजगार निर्मिती नसलेले जास्तीत जास्त शेतकरी वर्ग आसलेल्या या तालुक्यात जनतेची सेवा करून शासन पद्धतीने कठोर व योग्य निर्णय घेऊन शिस्तबध्द काम करतील अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे