प्रतिनिधी साहिल खान लोणार
लोणार 24 महिला सबलीकरणातूनच सशक्त भारत घडू शकतो असे वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख सौदीजाताई राठोड यांनी लोणार येथे महिला संवाद मेळाव्यात केले.
याप्रसंगी बोलताना त्यापुढे म्हणाल्या महिलांनी आपली शक्ती ओळखावी संविधानाने त्यांना समानतेचा अधिकार दिला आहे राजकारणात 50 टक्के आरक्षण दिले आहे त्याचा पुरेपूर फायदा घेऊन आपली शक्ती ओळखावी आणि स्वतःला राजकारण आणि समाजकारणात झोकून द्यावे महिला सशक्त झाली तरच भारत सशक्त होईल.
याप्रसंगी तालुकाप्रमुख श्रीमती संजीवनी ताई वाघ यांनीही आपले विचार मांडले आणि महिलांमधील आत्मविश्वास प्रबल झाला तर महिला प्रबळ होतील असे वक्तव्य केले राजेश मापारी यांच्या सभागृहात सदरील मेळावा संपन्न झाला या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून सौ सिंधुताई जाधव सभापती न पा लोणार सौ रंजना गोपाल बछिरे सौ शालिनीताई मोरे श्रीमती भारतीताई शिपे श्री इक्बाल कुरेशी श्री लुकमाल कुरेशी श्री श्रीकांत नागरे श्री राजूभाऊ बुधवंत श्री जीवन घायाळ श्री अश्रूबा धारकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर शेकडोच्या संख्येने महिला या मेळाव्यास उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन डॉ गोपाल बछिरे यांनी केले तर आभार प्रसेंजित बछिरे यांनी मानले