पंचवटी प्रतिनिधी आकाश निकम
सोमवार दिनांक १ मे २०२३ रोजी मनमाड ता. नांदगाव जिल्हा नाशिक येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मनमाड येथे राष्ट्रीय सत्संग मेळावा परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीमध्ये होणार असून संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून हजारो भाविक सेवेकरी या मेळाव्यासाठी आपली हजेरी लावणार आहे, गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा फक्त २०% अध्यात्म आणि ८०% समाजसेवा या तत्वावर समाज उपयोगी व राष्ट्रहितार्थ कार्य करत आहे, तरी समाजासाठी काहीतरी करायचे आहे हा प्रामाणिक हेतू आपल्या मनामध्ये ठेवून मेळाव्यास उपस्थित राहून परमपूज्य गुरु माऊलींचा आशीर्वाद व हितगुज श्रवण करण्याची नामी संधी आपणास मिळत आहे तरी मेळाव्यास उपस्तित राहून आपण गुरुमाऊलींचे दर्शन व हितगुजाचे लाभ घेऊ शकतात.