या संस्थेने आज दिनांक- 15/ 04/ 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा मोडाळे ता. इगतपुरी जि.नाशिक या शाळेस अतिशय उपयुक्त व टिकाऊ असे इयत्ता पहिली ते सातवी साठीच्या विध्यार्थीना शैक्षणिक साहित्य दिले..त्यात पझल्स, डॉमिनोज, शब्द व चित्रपट्या, अंक व शब्द पझल्स असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय उपयोगी व सुरेख साहित्य दिले असून साहित्य कसे हाताळावे याचे प्रशिक्षण सर्व शिक्षकांना Kotak education foundation च्या सदस्य शिक्षिका छाया सारुक्ते मॅडम यांनी दिले. तसेच आमच्या कडून छोटे छोटे प्रात्यक्षिक करून घेतले.. खूप छान साहित्य असून नक्कीचं मुले आनंदाने व कृतीतून शिकतील यात शंका नाही.
इतकेच नाही तर याच फाऊंडेशन कडून शाळेसाठी 12 फॅन, 12 ट्यूब लाईट, शाळेस अतिशय उपयुक्त असे इयत्ता पहिली ते चौथी च्या मुलांसाठी एकूण 30 टॅब , 3 लॅबटॉप , 50 इंची तीन टीव्ही सेट, टॅब चार्जिंग युनिट, वॉटर प्यूरीपायर, गणित साहित्य किट व वर्कबुक असे खूप साहित्य आज आमच्या प्राप्त झाले..या सगळ्या साहित्याचा नक्कीच मुलांना 100 टक्के फायदा होणार आहे..
या साठी विशेष प्रयत्नशील आमच्या गावचे विकासपुरुष गोरखभाऊ बोडके तसेच व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिदास सूर्यवंशी सदस्य तुकाराम गोऱ्हे सर्व SMC सदस्य शाळेतील मुख्याध्यापक चंद्रभागा तुपे, माधुरी पाटील, सुनीता सोनवणे, छाया सारुक्ते, आधार निकम, अनिल बच्छाव, प्रवीण,वानखेडे, अविनाश शिंदे , गनबोटे सर, आंबेकर सर तसेच गावकऱ्यांचे देखील वेळोवेळी सहकार्य मिळते अशी माहिती श्री रावसाहेब पगार सर यांनी दिली