लांजा येथे इफ्तार पार्टी चे आयोजन



सुर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी

        रत्नागिरी जिल्ह्यातील  लांजा तालुका पोलीस ठाणे आणि मुस्लिम वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता सय्यद चांदशहा बुखारी दर्गा लांजा येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.

या इफ्तार पार्टीला प्रमुख अतिथी म्हणून लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे तसेच लांजा तहसीलदार प्रमोद कदम, लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत, मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष रफिक नाईक तसेच जमातूल मुस्लिम लांजाचे अध्यक्ष शौकत नाईक तसेच सामाजिक कार्यकर्ते महंमद रखांगी, माहिती अधिकार महासंघाचे कार्याध्यक्ष रमजान गोलंदाज, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष परवेझ घारे, लांजा तालुका मराठा संघाचे सुभाष राणे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत