प्रविण चौरे ओझर प्रतिनिधी
ओझर : नॅशनल कॉन्फरन्स फाॅर मायनॉरिटी संस्थेच्या वतिने देण्यात येणारा राष्ट्रीय संविधानरत्न पुरस्कार नाशिक येथील रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांना जाहीर झाला असल्याचे पत्र नॅशनल कॉन्फरन्स फाॅर मायनॉरिटी चे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी दीले.
शनिवार दिनांक २७ मे रोजी द क्यान्सिट्युशन कल्ब आँफ इंडीया, संसद भवन मार्ग, नवी दील्ली या ठीकाणी विषेश मान्यवरांचे हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून या पुरस्काराबद्दल रविंद्रदादा जाधव यांचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा.ना.रामदासजी आठवले, माजी समाजकल्याण मंत्री अविनाश महातेकर, रिपाई प्रदेश अध्यक्ष मा.राज्यमंत्री राजाभाऊ सरोदे, रिपाई प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, रिपाई राष्ट्रीय उपाध्यक्षा शिलाताई गांगुर्डे, रिपाई नेते चिंतामण गांगुर्डे, समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डाॅ.रमेश सावंत, राष्ट्रीय उपाध्यक्षा प्रो.प्रेमलता जाधव, राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव वाघ, रिपाई नेते विश्वनाथ काळे, संजय भालेराव, रिपाई जिल्हाध्यक्ष विनोद जाधव, संजय गायकवाड, वसंत जाधव, सुरेश डांगळे, प्रदीप गांगुर्डे, प्रदीप पगारे, अजय शेजुळ, रफीक सैयद, मनिषा पवार, मनिषा म्हसदे, शशीभाऊ जाधव, कांचन जाधव आदींनी अभिनंदन केले आहे.