प्रतिनिधि : भिमराव कांबळे
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती देश, विदेशात मोठ्या उत्साहात साजरी होत असताना लातूर जिल्हयातील मौजे - ढाळेगांव ता. अहमदपूर येथे डॉ. आंबेडकर जयंती दिनी ग्रामपंचायत कार्यालयात लोकसेवका बरोबरचं लोकप्रतिनिधी यांनी महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करणे शासन निर्णयाप्रमाणेअनिवार्य असताना देखील वरिल सर्वांनी गैरहजेरी लावली त्यामुळे आंबेडकरवादी समाजबांधव यांच्या भावना दुखावाच्याचे नागरीकातून चर्चा होताना दिसत आहे
सामाजिक कार्यकर्ते माधव गुळवे रा. ढाळेगाव यांनी तहसिलदार अहमदपूर यांना याबाबत लेखी तक्रार करून संबंधितावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.