प्रतिनिधी - साहिल खान लोणार
लोणार तालुक्यात आज रोजी रेती उपसा बंद असतांना वझर आघाव खडकपुर्णा नदीपात्र (भुवन रेती घाटातुन) अवैधरीत्या खुलेआम रेती उपसा,जादा दराने रेती विक्री तसेच रेती साठवणुक करणा-यांवर तात्काळ कार्यवाही करणे बाबत नमुद विषयाची तक्रार रतन शेषराव मोरे,तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी,लोणार रा.वझर आघाव ता.लोणार यांनी आज दि.२४ एप्रिल रोजी तहसीलदार लोणार यांचेकडे दिली आहे.याबाबत सविस्तर वृत्त लोणार तहसील कार्यालयाच्या अंतर्गत येत असलेल्या वझर आघाव नदीपात्रा जवळील (भुवन रेती घाटातुन) आज रोजी कोणत्याही नदीपात्र, धरण व ईतर यातुन रेती लिलाव न झाल्यामुळे शासनाकडुन रेती उपसा बंद असतांना मात्र वझर आघाव नदीपात्रा जवळील (भुवन रेती घाटातुन) खुलेआम दिवस आहे की रात्र न पाहता अवैधरीत्या मजुराच्या सहाय्याने रेती टॅक्टर मध्ये नेवुन सदरील रेती साठवणुक सुरू असुन सदरील रेती आज रोजी घरकुल बांधकाम सुरू असणा-या तसेच ईतर बांधकामे सुरू असलेल्या गौरगरीब जनतेला जादा दराने विक्री करून मोठया प्रमाणात गौरगरीब जनतेची पिळवणुक होत आहे.
आज रोजी नदीपात्रातुन रेती लिलावच न झाल्याने रेती उपसा करणे बंद असतांना मात्र रेतीचा अवैध उपसा होत असुन रेती लोणार तालुक्यातील वझर आघाव जवळील गावांमध्ये जादा दराने रेती विक्री कोणालाही न घाबरता सर्रासपणे सुरू आहे तसेच आज रोजी मोठया प्रमाणात वझर आघाव गावात अवैधरीत्या रेती साठा होत असतांना याबाबत आपल्या कार्यालयाचे प्रतिनीधी तलाठी, मंडळ अधिकारी,नायब तहसीलदार यांना भ्रमणध्वनी व्दारे कळवुन सुध्दा दुर्लक्ष का ? शासनाकडुन रेती उपसा बंद असल्याने नागरीकांना चोरीछुप्या पध्दतीने जादा दराने रेती घ्यावी लागत आहे असे का ? आपल्या कार्यालयानेच रेती उपसा बंद केला असतांना आपलेच अवैध रेती साठा होत असतांना तसेच अवैध रित्या रेती खुलेआम तालुक्यात विक्री होत असतांना महसुल विभाग काय करीत आहे ? महसुल विभागातील प्रतिनीधीस अवैध रेती साठवणुक दिसत असतांना कार्यवाही का करत नाही कार्यवाही करण्यासाठी तक्रारच आवश्यक आहे का ? असे प्रश्न माझ्या मनात निर्माण होत आहे. मी बरेच वेळा आपल्या मंडळ अधिकारी व तलाठी वझर आघाव यांना या बाबत कळविले असतांना मात्र संबंधीत आम्ही तहसीलदार व एचडीओ यांना कळवितो असे म्हणत नेहमीच उडवा उडवीचे उत्तरे देत असुन कोणत्याच प्रकारची कार्यवाही न करीत असल्याने माझ्यावर आज रोजी लेखी स्वरूपात तक्रार करण्याची वेळ आली आहे. विशेषत: ही अवैध रेती शासकीय कामासाठी सर्रासपणे तहसील कार्यालयाची परवानगी न घेता ग्रामपंचायत वापरत आहे यावरून शासकीय कर्मचारी सुध्दा आपल्या तहसील कार्यालयाची दिशाभुल करीत असल्याचे दिसुन येत आहे.
तेव्हा आज रोजी ग्रामपंचायतीचे सुरू असलेल्या कामांची पाहणी करून रेती आणली कोठुन व रेतीची परवानगी याबाबत चौकशी करावी.आपल्या कार्यालयाकडुन चौकशी होत नसल्याने रेती माफिया, महसुल विभागाचे प्रतिनीधी तसेच ग्रामसेवक, लोकप्रतिनिधी यांना तहसील प्रशासनाची भिती नाही का ? यावरून शासनाचे प्रतिनीधीच शासनाला विश्वापसात न घेता हम करे सो कायदा करीत असल्याचे दिसुन येत आहे. नियमावली फक्त गौरगरीब सर्वसामान्य जनतेलाच आहे का ? आज रोजी मोठया प्रमाणात शासनाने घरकुल मंजुर केले असल्यामुळे सदरील घरकुल बांधकामे गौरगरीब नागरीक करीत असल्याने त्यांना आज रोजी रेती आवश्यक असल्याने गौरगरीब नागरीक जादा दराने रेती खरेदी करती असल्याने सदर बाब लक्षात घेवुन आपले स्तरावरून शासनाच्या नविन आदेशानुसार ऑनलाईन पध्दतीने रेती वितरण होणे बाबत आपले स्तरावरून लवकरात लवकर कार्यवाही करावी.तसेच माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून नियमानुसार कार्यवाही करावी. असे तक्रारीत नमुद आहे.