ग्रामसेविका मिनाक्षी सावंत - वाजे यांना जि.प. चा आदर्श ग्रामसेविका पुरस्कार


सुर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी 

          शहराजवळील भडगांव खोंडे  ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या ग्रामसेविका सौ. मिनाक्षी संदीप सावंत - वाजे यांना नुकताच रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श ग्रामसेविका पुरस्कार प्राप्त झाला आहे.त्यानिमित्त गुरुवारी २७ एप्रिल रोजीच्या आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचे औचित्य साधून सरपंच , उपसरपंच , सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

          ग्रामसेविका सौ. मिनाक्षी सावंत - वाजे यांनी खेड तालुक्यात मुरडे , चाकाळे , सवेणी , ऐनवरे , आदी गावांत काम केले असून सध्या त्या भडगांव खोंडे ग्रामपंचायतीत कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत केलेल्या प्रशासकीय कामाची दखल रत्नागिरी जिल्हा परिषदेने घेऊन त्यांना यावर्षीचा आदर्श ग्रामसेविका पुरस्कार प्रदान करून त्यांच्या आजपर्यंतच्या कामाचा गौरव केला आहे. भडगांव खोंडे वासियांनी सुध्दा त्यांचा सत्कार केला आहे. यावेळी सरपंच प्रमोद बैकर , उपसरपंच महेंद्र सावंत , माजी सरपंच अनंत लाले , श्रीकृष्ण देवस्थान  कमिटीचे अध्यक्ष परशुराम दवंडे , पाणी कमिटीचे माजी अध्यक्ष विजय दवंडे , युवा सामाजिक कार्यकर्ते सुरज जोगळे , सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. गांधी , ज्येष्ठ पत्रकार दिवाकर प्रभु आदी उपस्थित होते.