नागरी सुविधाप्रश्नी धरणे आंदोलन

अनिकेत मशिदकर मालेगाव प्रतिनिधी 

       28 एप्रिल मालेगाव : शहरातील विविध नागरी समस्याप्रश्नी येथील सार्वजनिक नागरी सुविधा समिती आक्रमक झाली आहे. महापालिकेला वारंवार निवेदन देऊनही दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. २६) रोजी येथील रामसेतू पुलाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. 

       धर्मशाळा तोडणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात यावी, मोसम नदीपात्रातील गटारीची ८० कोटी रुपयांची योजना अकार्यक्षम, जागोजागी चेंबर भरून रक्तमिश्रित पाणी परत सांडव्या पुलावरून वाहत असून ते दुरुस्त व्हावे, मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा, शहरांमध्ये लोकसंख्येपेक्षा अनेक पटींनी डासांचा हैदोस, डासांमुळे जनता त्रस्त झाली आहे, यावर उपाययोजना होणे करावी, बेकायदेशीरपणे पार्किंगवर उपाययोजना करणे व पार्किंग झोन तयार करणे, रामसेतू पूल, आंबेडकर पूल, सांडवा पूल हे रहदारी बंद करावेत, पूल अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे शहरात नियमितपणे स्वच्छता व साफसफाई करण्यात यावी, आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.

         या आंदोलनात समितीचे बोरसे यांच्यासह भरत पाटील, देवा पाटील, गणेश पाटील, अमोल चौधरी, जितू देसले, माजीद मन्सुरी, राजू तिवारी, दादा हिरे, बोगीलाल पटेल, गजानन येवले, सुरेश गडरी, प्रशांत वाघ, दीपक पवार, नीलेश पाटील, सागर शाहू, बाळकृष्ण बोरसे, नितीन वाणी, रमेश चौधरी, नितीन पांडे, प्रभाकर खैरनार, संजय साबळे, पप्पू चव्हाण, आदी सहभागी होते..