सोयगाव तालुक्यात विविध ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा


पंडित दीनदयाल जी उपाध्याय व शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून स्थापना दिवस साजरा 


       दिनांक सहा एप्रिल गुरुवार भाजपा स्थापना दिनानिमित्त,  सोयगाव तालुका, फर्दापूर सर्कल मध्ये विविध बूथ वर धवजरोहन तसेच पंडित दीनदयाळ जी उपाध्याय व ,शामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून43 वा स्थापना दिवस साजरा केला  तालुका अध्यक्ष भाजप गणेश लोखंडे व उपअध्यक्ष विनोद टिकारे यांनी सावळदबारा.डाभागाव, नांदागाव तांडा घाणेगाव देवारी टीटवी अशा तालुक्यातील विविध गावात भेटी देऊन आपापल्या कार्यालयावर पक्ष ध्वज फडकविण्यातआला.



     भारतीय जनता पक्षाची स्थापना 6 एप्रिल 1980 सली झाली भाजप पक्षाला 43 वर्षे पूर्ण झाले असून जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे यावेळी जेष्ठ नागरिक व करकर्त्यांचा सत्कार करण्यात आला,युवकांचा भाजपामध्ये प्रवेश करून घेतला तसेच बुथप्रमुख व पदाधिकारी यांच्या मोबाईल मध्ये सरल ऍप डाउनलोड करून माहिती भरून घेतली तसेच सर्कलमध्ये पाच ठिकाणी भिंती रंगवून कमळ चिन्ह व एक बार फिरसे मोदी सरकार घोषणा दिल्या या प्रसंगी, भाजपा SC मोर्चा तालुका अध्यक्ष-शांताराम खराटे,माजी सरपंच ईश्वर कोळपे दीपक मानकर  शरीफ तडवी गणेश कोळपे व सोयगाव तालुक्यातील सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते