सुर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी
लाखो रुपये खर्च करुन धुळखात पडलेला पाणीशुद्धीकीकरण संच...तब्बल सहा महिने टीसीएल पावडरची न केलेली खरेदी.....न.प.चा कारभार प्रशासनाच्या हाती....निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष....या आणी अशा विवीध समस्यांच्या गर्देत नं. प. सापडल्याने गेले अनेक महिने पूरविण्यात येणार्या दुषित पाणी पुरवठ्यामुळे शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहराला ५ लाख लिटरच्या तीन, १लाख ७० हजारच्या दोन, १लाख ८० हजारच्या दोन तर १लाख ६८ हजार, ३लाख ४० हजार, १लाख ५० हजार, १लाख यांच्या प्रत्येकी एक अशा एकूण २९लाख ५८ हजार लिटर क्षमतेच्या ११ साठवण टाक्यांद्वारे दररोज पाणीपूरवठा करण्यात येतो. हा पाणीपुरवठा ग्रॕविटीने बोरज धरणातील पाण्यावर केला जातो. मात्र हे धरण एप्रिलमध्येच कोरडे पडत असल्याने नातूवाडी धलाणाच्या पाण्यावर शहरवासियांची तहान भागवावी लागते.
नातूवाडी धरणातील पाणि जगबुडीद्वारे भरणे जॕकवेल येथे साठवले जाते. हे शुद्धीकरण करुन पुरवठा करणे गरजेचे असतानाहि नदिचे पाणी थेट नागरिकांना पुरविण्यात येत आहे. त्यातच गेले सहा महिने शुद्धीकरणासाठी आवश्यक असलेली टीसीएल पावडरच उपलब्ध नसल्याची धकादायक बाब समोर आली आहे.
आरोग्य आणी विकासाच्या आणाभाका घेत मतांचा जोगवा मागून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत कीठे? असा यक्ष सवाल शहरवासियांमधुन उपस्थित केला जात आहे.