आपल्या स्वामी समर्थ नगर, मध्ये सतत निर्माण होणाऱ्या पाणी समस्या संदर्भात कायमस्वरूपी हा प्रश्न मार्गी लावून, सर्व नगरवासियांना दिलासा द्यावा, तसेच कोणार्क नगर परिसर चौफुली जत्रा नांदूर रोड येथे प्रचंड प्रमाणात वर्दळ असते, तसेच शाळकरी व वृद्ध नागरिक यांना काही अपघात होऊ नये म्हणून रम्बलर्स स्पीड ब्रेकर बसवावे तसेच बाजार भरतो त्या रस्त्याला मोठे खड्डे पडलेले आहेत ते त्वरित भरावेत यासाठी विनंती अर्ज पंचवटी महानगर पालिका तत्कालीन विभागीय अधिकारी शिंदे साहेब यांना निवेदन गिरीश काकळीज स्वामी समर्थ नगर मधील नागरिक तसेच मनसे शाखा अध्यक्ष आकाश निकम प्रभाग 2 यांच्याकडून देण्यात आले.