अंबुलगा (बु) येथे रमजान ईद उत्साहात साजरी


 अंबुलगा (बु) येथे रमजान ईद उत्साहात साजरी


प्रतिनिधी, सदाशिव काकडे
22 एप्रिल 2023

 अंबुलगा (बु) : एक महिन्याचे कडक रोजे संपल्यानंतर प्रतिक्षा असते ती रमजान-ईद च्या दिवसाची. 21 एप्रिल 2023 रोजी रात्री चंद्रदर्शन झाले व दुसऱ्या दिवशी सकाळी अंबुलगा (बु) येथील ईदगाह मैदानात मुस्लिम बांधवांच्या वतीने सामुहिक नमाज अदा करण्यात आली. तसेच एकमेकांना ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या. अतिशय आनंदी वातावरणात अंबुलगा (बु) येथे रमजान ईद साजरी करण्यात आली.