मालेगावी क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन


अनिकेत मशिदकर मालेगाव प्रतिनिधी 


         क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा या पुतळ्याचे भूमिपूजनाचा कार्यक्रम काल दि:- 11 एप्रिल 2023 रोजी संपन्न झाला‌. महाराष्ट्र राज्याचे बंधारे खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री नाशिक मा. ना. दादाजी भुसे यांच्या हस्ते व आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता करण्यात आले. 



           या कार्यक्रमाप्रसंगी मा. आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी, सहाय्यक आयुक्त सचिन महाले, शहर अभियंता कैलास बच्छाव, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, उप अभियंता शांताराम चौरे, कनिष्ठ अभियंता महेश गांगुर्डे, प्रभाग अधिकारी जगदीश बडगुजर, माजी उपमहापौर सखाराम घोडके, निलेश आहेर, माजी नगरसेवक संजय दुसाने, राजेश गंगावणे, भारत चव्हाण, निलेश काकडे, सामाजिक कार्यकर्ते मनोहर बच्छाव, विनोद वाघ, डॉ तुषार शेवाळे, हरिप्रसाद गुप्ता, देवराज गरुड, अशोक कापे, महादू पगारे इत्यादी उपस्थित होते.