बालभैरवनाथ फाऊंडेशन मार्फत गुणवंतांचा सत्कार

    भरविरखुर्द ता.इगतपुरी जि.नाशिक येथे मंगळवार दि.4 एप्रिल 2023 रोजी बालभैरवनाथ फाऊंडेशनतर्फे ग्रामदैवत बालभैरवनाथ महाराज यात्रेच्या दिवशी गावांतील विविध क्षेत्रात कामगिरी करणार्‍या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. सदर सत्कारसमारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालभैरवनाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.तुकाराम सारुक्तेसर हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून गांवचे भूमीपुत्र व पेठ येथील दादासाहेब बीडकर काॅलेजचे प्राचार्य डाॅ.आर.बी.टोचेसर हे होते.

       याप्रसंगी शासकिय नोकरीत पदोन्नती झालेले श्री.अशोक बेंडकोळी (मुंबई महापालिका),श्री.चांगदेव सारुक्ते (मुंबई महापालिका),श्री,रंगनाथ सारुक्ते (एस.टी.महामंडळ),श्री.रमेश कोकणे (भारतीय सैन्यदल),श्री.तुकाराम सारुक्ते(शिक्षक पतसंस्था निवड),श्री,रोहिदास टोचे (पंजाब नॅशनल बॅंक): यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तर खेळांमध्ये कु.जयश्री टोचे (नौकानयन-राष्ट्रीयस्तर),कु.बाळू जुंदरे (कुस्ती-राष्ट्रीयस्तर),कु.पांडुरंग जुंदरे (कुस्ती-राष्ट्रीयस्तर),कु.आदित्य सारुक्ते (टार्गेटबाॅल-राज्यस्तर),कु.आदर्श आढळ (किकबाॅक्सिंग राज्यस्तर),कु.प्रतिभा सारुक्ते (कुस्ती जिल्हास्तर),कु.साक्षी कोकणे (कराटे राज्यस्तर),कु.तुषार सारुक्ते(कुस्ती-जिल्हास्तर)कु.प्रथमेश भालेकर (वक्तृत्व-तालुकास्तर) या खेळाडूंना ट्राॅफी देऊन सन्मानित करण्यात आले.

           या कार्यक्रमासाठी श्री.तुकाराम सारुक्तेसर,प्रा.डाॅ.आर.बी.टोचेसर,श्री.प्रभाकर कोकणे,श्री.दिलीप टोचे,श्री.सिताराम सारुक्ते,श्री.शिवाजी काजळे,श्री.मुरलीधर बांडे,श्री.शंकर पुंडे,श्री,सावळीराम बेंडकोळी,श्री.किसन बेंडकोळी,श्री.संदिप कोकणे,श्री.चंद्रभान पुंडे,श्री.रमेश टोचे(पोलिस पाटील),श्री.रामभाऊ सारुक्ते (मा.सरपंच) व फाऊंडेशनचे सभासद,संचालक व ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते अशी माहिती श्री रावसाहेब पगार सर यांनी दिली