लोणार तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11वाजता लोणार चे तहसीलदार गिरीश जोशी यांना“शर्म करो मोदी, शर्म करो" आंदोलना चे लोणार शहर काँग्रेस वतालुका काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले भाजपचे वरिष्ठ नेते, जम्मु काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना व ३०० कोटीच्या ऑफरचा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. सत्यपाल मलिक यांनी केलेले आरोप, भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. पुलवामा घटनेमध्ये ४० जवानांचे बळी गेले आणि त्यात सरकारची चुक असणे हे निदर्शनास आणून दिले असता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना गप्प राहण्यास सांगितले, असाही थेट आरोप मलिक यांनी केला असून त्यांच्या आरोपांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अद्यापही उत्तर दिलेले नाही.
माजी राज्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात संशय व संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे खालील प्रश्नांवर "शर्म करो मोदी शर्म करो" हे आंदोलन सोमवार दिनांक १७ एप्रिल २०२३ ला सकाळी ११ वाजता लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश मापारी व शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्या नेतृत्वात आज लोणार तहसिल कार्यालया समोर आंदोलन करून निवेदन देण्यात आले प्रांताध्यक्ष मा.आ.नानाभाऊ पटोले यांनी दिलेल्या आदेशाने व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आता माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांच्या सूचनेनुसार आज लोणार तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले
पुलवामा घटनेत केंद्र सरकारची अक्षम्य चुक झाली आहे, या वक्तव्यावर मलिक यांना गप्प राहण्यास का सांगितले गेले ? भारतीय जवानाना दुसरीकडे पाठविण्यासाठी विमानाची मागणी केली असता, ती का नाकारण्यात आली ?पुलवामा घटनेत वापरले गेलेले ३०० किलो आर.डी.एक्स. कुठून आले ? ४) पुलवामा घटना व ४० जवानांचे बलिदान हे भाजपा व नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी केले होते का ?श्री मलिक यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटन महासचिव राम माधव यांनी ३०० कोटी रूपयांची ऑफर का दिली ?
या सर्व प्रश्नांचे उत्तर जनतेला मिळाले पाहीजे आणि ना खाऊंगा, ना खाने दूंगा अशा गर्जना करणा-या नरेंद्र मोदी यांनी प्रश्नांचा खुलासा करून सत्य काय आहे, ते जाहिर केले पाहीजे. यासाठी "शर्म करो मोदी, शर्म करो" हे आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष राजेश मापारी,काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साहेबरावजी पाटोळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी, उपनगराध्यक्ष बादशाह खान, गट नेते भूषण मापारी, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष तोफिक कुरेशी, नगरसेवक संतोष मापारी, नगरसेवक शेख रहुफ भाई, माजी नगरसेवक प्राध्यापक सुदन कांबळे,युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष भारत राठोड, नगरसेवक शेख करामत शेख गुलाब माजी नगरसेवक पंढरी चाटे, माजी नगरसेवक शंकर हेंद्रे, रामचंद्र कोचर,माजी नगरसेवक शेख अस्लम भाई, गजानन मापारी, मीडिया सेलचे शहराध्यक्ष मोहसिन शहा, मनीष पाटोळे ,कामगार सेलचे शहराध्यक्ष अफसर भाई, श्रीकृष्ण बाजाड, शेख अजमत शेख अनामत, सय्यद मुमताज, आप्पा रामा शिंदे, विश्वनाथ भाऊ, शेख हेमंन शेख अस्लम, मुस्तकीन कुरेशी, राहुल सरसरे, अजगर खान अन्सार, मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते