आंबेडकरी चळवळ पूढे नेण्यासाठी तरूणांनी पूढाकार घ्यावा.!- डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी



प्रतिनिधी - भिमराव कांबळे

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या कष्ठातून प्रस्थापित व्यवस्थेविरूध्द बंड करून देशात संविधानाच्या माध्यमातून समता प्रस्थापित केली आहे. संविधाच्या रूपाने दिलेली जीवन मूल्य अधीक खोलवर रूजविण्यासाठी आंबेडकरी चळवळीची नितांत आवश्यकता असून ही चळवळ वृध्दींगत करण्यासाठी यूवकांनी पूढाकार घ्यावा असे आवाहन यूवक नेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले. मौजे काळेगांव ता. अहमदपूर येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.

अध्यक्षस्थानी या प्रसंगी प्रमुख पाहुणे ग्रामपंचायतीचे सरपंच सय्यद खिजरभाई,शूकूरभाई जागीरदार,शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब वाघमारे,मतीनभाईविलासभाऊ पाटील,वैजनाथ गायकवाड,गोपाळभाऊ पाटील,गंगाधर गायकवाड,रमेश गायकवाड,शशिकला गायकवाड, प्रा.ननीर सर,प्रा.कारामुंगीकर आदींची उपस्थिती होती.पूढे बोलताना डाॅ.सिध्दार्थकूमार सूर्यवंशी म्हणाले की,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप नियोजन पूर्वक समाजाला दिशा देण्यासाठी भारतीय बौध्द महासभा, समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी आदी संस्थांच्या स्थापना केल्या आहेत.या संस्था डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर सांभाळण्याची जवाबदारी समाजाची असून या सर्व संस्था टिकविण्यासाठी-फूलविण्यासाठी समाजाने पूढे यावे असे अवाहनही त्यांनी केले.

सूरूवातीला तक्षशिला बुध्द विहाराचे पुज्यभंते महाविरो थेरो यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.या नंतर त्यांनी त्रीशरण पंचशिल दिले आणी शेवटी धम्मदेसना दिली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती मंडळाचे पदाधिकारी आणी शांती दूत मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पूढाकार घेतला.