ऐतिहासिक साधने एक महत्वाचा दस्तऐवज- प्रा. अजय अहिर

 


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय निमगाव येथे इतिहास विभागाच्या वतीने  'इतिहास संशोधन पद्धती' या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.   व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगांव येथील प्रा. अजय अहिर हे उपस्थित होते. त्यांनी इतिहासाची साधने या महत्वपूर्ण विषयावर आपले मौलिक विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उज्जन कदम उपस्थित होते.

        प्रा.अजय आहिर यांनी आपल्या व्याख्यानात इतिहास म्हणजे काय? व इतिहासाची साधने म्हणजे काय?  हे सांगून इतिहासाच्या साधनांचे प्रकार सांगितले. त्यात त्यांनी इतिहासात प्राथमिक व दुय्यम साधनाचे महत्त्व स्पस्ट करतांना पुरातत्वीय, लिखीत, अलिखीत साधनांचे इतिहास लेखनातील महत्त्व विशद केले. तसेच स्थानिक इतिहासात कोण-कोणत्या साधनांचा उपयोग करता येतो हे विविध उदाहरणातून स्पष्ट केले.तसेच महाराष्ट्रातील विविध इतिहास संग्रहालयांची ओळख करून देतांना त्या संग्रहालयांचे महत्त्व पटवून दिले.कोणत्याही जमातीचा, संस्कृतीचा, देशाचा, जगाचा इतिहास जाणून घ्याववयाचा असेल तर ऐतिहासिक साधनांचा दस्तऐवज मोलाची भूमिका पार पाडत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.उज्जन कदम यांनी आपल्या भाषणातून इतिहासाचे महत्त्व सांगून इतिहासाच्या विविध पैलूंचा मानवी जीवनावर पडणारा प्रभाव स्पस्ट करून 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' या उक्तीचा उल्लेख केला.

कार्यक्रमाचे संयोजक प्रा. उद्धव कुडासे यांनी व्याख्यानमालेचे महत्त्व पटवून देत असताना वर्तमान परिस्थितीत इतिहासाचे महत्त्व सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .भाऊसाहेब पवार यांनी केले.  कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ.भरतचंद्र शेवाळे व सर्व प्राध्यापक, शिक्षेकेतर, कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.