तळेगांवचे डॉ.गजानन जाधव यांना महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय व्यसनमुक्ती,मधुमेहमुक्ती पुरस्कार प्रदान



सम्राट फाउंडेशन महाराष्ट्र राज्य येवला व आदर्श माता सिंधुताई सपकाळ अनाथ आश्रम गणोरे  यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रधान


तळेगाव ता. जामनेर ता.५ सम्राट फाउंडेशन महाराष्ट्र राज्य येवला व आदर्श माता सिंधुताई सपकाळ अनाथ आश्रम गणोरे ता. अकोले जि.अ.नगर यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र मध्ये आपल्या कार्यक्षेत्रात समाजात उल्लेखनीय कामगिरी  करणाऱ्या आदर्श व्यक्तीला विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी २०२३ राज्यस्थरीय पुरस्कार व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती सामाजिक धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल  डॉ. गजानन देवचंद जाधव तळेगाव ता. जामनेर जि. जळगाव (खान्देश) ह.मु.वाघोली पुणे यांना आदरपूर्वक मान्यवरांच्या हस्ते सम्राट फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष राहुलजी सोनवणे सर, मा.नरेंद्रभाऊ दराडे,(विधानपरीषद आमदार) नगराध्यक्ष प्रदीप थोरात, मा.विनायकराव रावाजी लोंढे (मा.प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश येवला ) ,विनायक वाहुल,आमदार मारोतराव पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

    डॉ.गजानन जाधव हे सन २००० पासुन निसर्गोपचार पद्धतीने व आयुर्वेदिक पद्धतीने व्यसनमुक्ती - दारु सोडवा नं. सांगता नं.आणता घर बसल्या संपूर्ण महाराष्ट्रात कार्य करत असून २०२२ पासुन मधुमेहमुक्त (शुगर डायबिटीस) वर उल्लेखनीय कामगिरी करुन आणि कुटुंबीयांना नवसंजीवनी देऊन समाजात आर्दश निर्माण करणाऱ्या व्यसनमुक्ती मध्ये मुक्ती २०२३ चा भव्य महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते  प्रदान करण्यात आला. त्यामुळे डॉ. गजानन जाधव यांचे  जय गजानन बहुउद्देशीय संस्था, तळेगाव,शेलगाव तसेच  जामनेर  तालुका  ग्रामीण  पत्रकार  मंच  शिवाजी  जाधव, गजानन कोली सर, शांताराम जाधव, आर. के.सर मनोज  माली  पेपर  एजेंट,  सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.