*तेरी ईद मैं मना लूँ, मेरी मना ले तू* *दिवाली* …!
*छोड़ दे सब फसादों को,*
*देश में होने दे खुशहाली...*
{किरण माने इंदापूर प्रतिनिधी}
{22 एप्रिल शेळगाव} येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरा झाला.शेळगाव या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन नमाज पठण केले.
तसेच j.k क्रीडा प्रबोधनीच्या खेळाडूंनी तसेच ग्रामस्थांच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. शेळगाव मधील हिंदु समाजातील काही लोक हे रमजानच्या महिन्यामध्ये उपासना, प्रार्थना करत असतात. आणि म्हणूनच शेळगाव या ठिकाणी हिंदू मुस्लिम सामाजिक एकीचे प्रतीक दिसून येत आहे..
या कार्यक्रमासाठी,रामदास शिंगाडे (सरपंच),राहुल जाधव ( संचालक),नितीन जाधव (मा उपसरपंच),वैभव शिंगाडे (युवानेते), मोहन खराडे,महेश खराडे,गणपत भोंग,बबलू निंबाळकर,चंद्रकांत जाधव,भीवा जाधव,विठ्ठल ननवरे,आबासाहेब दुधाळ,परशुराम मोहिते (गुरुजी),पोपट ननवरे,बापूराव दुधाळ, धनाजी ननवरे,वाघ गुरुजी,प्रशांत भुजबळ,संतोष सूर्यवंशी तसेच प्रबोधनीचे मार्गदर्शक कैलास जाधव, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे PSI जगताप साहेब, पाटील साहेब, डोईफोडे साहेब, पोलीस पाटील वाघमोडे, खेळाडू आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.