जि.प.कें.प्रा.शाळा कन्नड नं.१ मध्ये आंबेडकर जयंती साजरी



प्रतिनिधी-सतीश कोळी,खुलताबाद

    दि.१४ एप्रिल २०२३ १३२ व्या जयंतीनिमित्त जि.प.कें.प्रा.शाळा कन्नड नं.१ मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.  यावेळी केंद्रीय मुख्याध्यापक सतीश कोळी यांच्या हस्ते महामानवास मानवंदना देऊन हार अर्पण करण्यात आला. उपस्थित जेष्ठ शिक्षिका कल्पना सुर्यवंशी, साजेदा बेगम,सबा अन्सारी, अर्चना पाटील, सुवर्णा गायके, कल्याण राऊत,शाळा व्यवस्थापन समिती च्या उपाध्यक्षा मोनिका शेजवळ उपस्थित होत्या. उपस्थितांना सतीश कोळी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयी माहिती दिली.

डॉ आंबेडकर हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, बॅरीस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, मानवी हक्कांचे कैवारी आणि बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. शिवाय ते भारत देशातील कोट्यवधी शोषित पददलितांचे उद्धारक आणि स्वतंत्र्य भारतीय संविधानाचे शिल्पकार होते.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे टोपणनाव :बाबासाहेब जन्म :१४ एप्रिल १८९१,मृत्यू :~६ डिसेंबर १९५६ पुरस्कार : ~भारतरत्न (१९९०),डॉ. भीमराव रामजी आंबेडकर,देशातील सर्व जाती धर्मातील लोकांच्या उन्नतीसाठी कार्य करणारे, राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.अर्चना पाटील यांनी बाबासाहेबांची वैशिष्टे सांगितली. बाबासाहेब हे महान संशोधक, विश्वरत्न, विश्वभूषण, युगपुरूष, युगप्रवर्तक, महामानव, उच्च विद्याविभूषीत, परोपकारी, क्रांतीसूर्य, घटनासम्राट, घटनापती, बुद्धीसम्राट, समाजसूर्य,

पञकार, समाजशास्ञज्ञ, अर्थशास्ञज्ञ, कायदेतज्ञ, इतिहासकार, संविधानाचे जनक, तत्वज्ञानी, मानववंश शास्ञज्ञ, दलित आणि महिला अधिकाराचे उद्धारक, देशातील पहिले कामगार मंञी, संस्कृत व हिंदी साहित्याचे अम्यासक, विज्ञानवादी, जलतज्ञ, समता, स्वातंञ्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्त्ये, गोरगरीब कामगारांचे उद्धारक होते. कल्पना सुर्यवंशी यांनी १४ एप्रिल या सोनेरी दिवसाचे समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्व आहे. खेड्यापाड्यापासून ते दिल्लीपर्यंत बाबासाहेबांची जयंती उत्सवात साजरी केली जाते असे सांगितले.

 सुवर्णा गायके यांनी   बाबासाहेब जगातील सर्वात बुद्धीमान तसेच उच्चशिक्षित म्हणून ओळखले जातात. बाबासाहेबांच्या वाचनात, चिंतनात व लेखनात प्रचंड ताकद, शक्ती होती. बाबासाहेबांनी तळागाळातील सर्वसामान्य माणूस जागा केला. त्याला आत्मसन्मान, स्वाभिमान, अस्मिता व सामर्थ्याची जाणीव करून दिली. मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले. हक्काने जागण्याचे शिकविले. म्हणूनच भाग्यविधाता, महाविद्वान अशा अनेक उपाधींनी बाबासाहेबांना भारतीय जनते गौरविले आहे असे सांगितले. सबा अन्सारी म्हाणाल्या की,सर्वप्रथम बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांचे अनुयायी त्यांना ‘बाबासाहेब’ म्हणत असत, नंतरच्या काळात हेच नाव रूढ झाले आणि त्यांचे विरोधकही त्यांना बाबासाहेब संबोधू लागले. आज संपूर्ण भारत आणि विश्व त्यांना ‘बाबासाहेब’ संबोधीत आहे.

शैक्षणिक विचार-शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाली की, तो किंवा ती पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावी. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाेतेे की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते. 

साजेदा बेगम यांनी स्वातंत्र्य लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ जातिव्यवस्थेच्या विरोधातच लढत होते असे नव्हे, किंवा ते केवळ विशिष्ट एका समाजाच्या विकासाचाच केवळ विचार करत होते असेही नव्हे. त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचेही भान होते. शिक्षण,  अंधश्रद्धा, स्त्रियांची स्थिती,अर्थकारण, राजकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था या मुद्यांकडेही त्यांचे अवधान होते. बाबासाहेबांनी भारतातील सर्व समाजांचा आणि सर्वप्रथम देश हिताचाच विचार केलेला आहे. एकीकडे ते जसे १९३० ते ३२ मध्ये झालेल्या गोलमेज परिषदांतून अस्पृश्यांच्या न्याय व हक्कांसाठी लढतात तसेच दुसरीकडे ते भारतातील सर्व स्त्रीयांच्या उन्नतीसाठी विशेषत हिंदू समाजातील स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा, संपत्तीतील हक्क,घटस्फोट इत्यादीबाबत स्वातंत्र्य मिळावे म्हणून हिंदू कोड बील संसदेत मांडतात आणि ते नामंजूर झाले म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही देतात. स्त्रीयांना त्यांचा अधिकार मिळत नाही यामुळे बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा त्याग केला.

१९३० सालच्या लंडन मधील गोलमेज परिषदेच्या वेळी त्यांनी ब्रिटिशांना भारत सोडावा असे ठणकावून सांगितले होते. आपल्या पी.एचडी. च्या प्रबंधातूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विश्र्लेषण केले होते असे सांगितले.