येवला वार्ताहर:-पंकज गायकवाड
कृषी उत्पन्न बाजार समिती येवला निवडणुकीची रणधुमाळी काल झालेल्या माघारीनंतर आज खऱ्या अर्थाने सुरू झाली. येवला तालुक्याचे आमदार श्री छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल व ज्येष्ठ नेते अडव्होकेट माणिकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी समर्थक पॅनल यांच्यात चुरस दिसून येत आहे. येवला विधानसभा मतदारसंघाचे आमदार ना.श्री छगनरावजी भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनल निवडणूक प्रचाराचा शुभारंभ आज कोटमगाव येथील जगदंबा माता मंदिर येथे करण्यात आला, व पुढील मार्गदर्शनाचा कार्यक्रम कुलस्वामीनी लॉन्स,कोटमगाव येथे पार पडला.
याप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक ,मतदार,कार्यकर्ते,नेते उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून माजी आमदार श्री मारोतराव पवार,सहकार नेते श्री अंबादास बनकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्री दिलीप अण्णा खैरे हे उपस्थित राहिले. यावेळी युवा नेते श्री संभाजी पवार,श्री विश्वासबापू आहेर, मा.जिल्हा परिषद अध्यक्ष श्री राधाकीसन सोनवणे,श्री अरुण मामा थोरात,मच्छिंद्र थोरात, मा.जिल्हा परिषद सदस्य श्री महेन्द्र शेठ काले, भगिनाथ पगारे,मकरंद सोनवणे,साहेबराव मढवई,ऍडव्होकेट.श्री.बाबासाहेब देशमुख,गणपत कांदळकर,माजी सभापती प्रवीण गायकवाड,सर्व उमेदवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.