नव्या शैक्षणिक वर्षात...शाळेतील पहिले पाऊल



येवला ता.२१:- (पंकज गायकवाड)

        जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे स्टार्स प्रकल्पांतर्गत शाळा पूर्व तयारी अभियान केंद्रस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा सायगाव येथे आयोजित करण्यात आली होती. पहिलीत दाखल पात्र बालकांसाठी शाळा पूर्वतयारी अभियान संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन केंद्रप्रमुख श्री रवींद्रनाथ शेळके मुख्याध्यापक श्री खरोटे ,श्री वैद्य यांनी केले .जून पासून विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश करण्यासाठी, शाळा पूर्व तयारी अभियान मार्च ते जून या कालावधीत दाखल पात्र बालकांसाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. 

    अभियाना अंतर्गत प्रत्येक शाळेमध्ये दाखल पात्र बालके, माता पालक, शिक्षक ,अंगणवाडी सेविका ,स्वयंसेवक, पालक यांच्या मदतीने शाळा स्तरावर पहिला मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. पहिल्या मेळाव्यानंतर माता ,पालकांच्या व स्वयंसेवकांच्या मदतीने बालकाची शाळा पूर्वतयारी पाच ते सहा आठवडे करून घेण्यात येईल .त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये दुसरा मेळावा घेऊन बालकांची शाळा पूर्वतयारी पूर्ण करून घेण्यात येईल .त्यानंतर बालक पहिली मध्ये दाखल होईल केंद्रस्तरीय प्रशिक्षणासाठी केंद्रप्रमुख रवींद्रनाथ शेळके यांनी विशेष परिश्रम घेतले.