रंगराव खोत झरी प्रतिनिधी (निलंगा)
जि प प्रा शाळा झरी येथे आज दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी इयत्ता पहिलीच्या प्रवेश पात्र मुलांचा प्रवेशोत्सव मेळा घेण्यात आला. माता याप्रसंगी प्रवेश पात्र विद्यार्थी व त्यांच्या माता मेळाव्याला उपस्थित होत्या, त्याप्रसंगी सर्व प्रवेश पात्र विद्यार्थी च्या मातांची एक तास अगोदर उद्बोधन शिबिर घेण्यात आले. यात मुख्याध्यापक कालिदासराव बिराजदार सर , पडिले सर व सर्व शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले, व सुट्टी मध्ये मुलांकडून कोणकोणत्या कृती करून घ्यायच्या आहेत याविषयी चर्चा करण्यात आली. यानंतर क्रमाने मांडलेल्या सर्व टेबलवर सर्व मातांनी आपल्या पाल्याच्या कृती विषयीची माहिती घेतली व विद्यार्थ्यांमध्ये अनुकूल बदल करण्यासाठी चा निश्चय केला तदनंतर सर्व प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, चॉकलेट ,फुगे देऊन सत्कार करण्यात आला .अशाप्रकारे मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यात आला.