तरसाळी येथे यात्रोत्सवानिमित्त कुस्ती दंगल


सटाणा प्रतिनिधी आकाश साळुंके : 

             तरसाळी.ता.बागलाण येथे पंरपरेनुसार दरवर्षी अक्षय तृतीये निमित्त ग्रामदैवत श्री बंडुबाबा यात्रोत्सव साजरा करण्यात येतो, सर्व ग्रामस्थांच्या योगदानातुन यात्रोत्सवात कुस्ती स्पर्धा, किर्तनसोहळा, लोकनाट्य तमाशा, भंडारा,असे उपक्रम राबविले जातात, त्यानुसार यावर्षीही शनिवार दि.२२ रोजी दुपारी ४ वा.कुस्ती दंगल, रात्री ८वा. ह.भ.प. नंदु महाराज चिखल ओहोळकर यांचे सुश्राव्य किर्तन, व सोमवार दि.२४रोजी रात्री ९वा. रविंद्र भाऊ धुळेकर यांचा लोकनाट्य तमाशा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, परीसरातील कुस्ती प्रेमी व भाविकांनी वरील सर्व कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन ग्रामदैवत श्री बंडु बाबा यात्रोत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे...