जि.प.प्रा.शा.झरी येथे साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे केली.श्री दत्ता मुळजेसरांनी सविस्तर माहिती दिली. श्री आनंद जाधव सरांनी आंबेडकर यांच्या कार्याची माहिती सांगितली. शेवटी मु.अ. कालीदास बिराजदार सरांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले की. कितीही कठीण परिस्थिती येवो शिक्षण घेतलेच पाहिजे.
गावातील जेष्ठ नागरिक तथा माजी मुख्याध्यापक श्री प्रकाश बिरादार सर हे आवर्जुन कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच श्री नरसिंग बिराजदार हे पण कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांचा पण पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमात सहभागी सर्वांचे आभार मानून सांगता झाली.