बाबासाहेबांचा पुस्तक वाचनाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा--आनंद हुरदळे


उदगीर (प्रतिनिधी)  पुस्तके वाचून ज्ञान आत्मसात करण्याचा बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेऊन ज्ञानात भर टाकावी असे विचार आनंद हुरदळे यांनी व्यक्त केले. संगीता मोतीपवळे सार्वजनिक वाचनालय नविन वसाहत मलकापूर ता.उदगीर येथे महामानव भारत रत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली 

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ नागरिक मनोहर कांबळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.वसंत गोखले,आनंद हुरदळे, ग्रा.प,सदस्य जितेंद्र बोडके,ग्रा.प.सदस्य महेश तोडकर,ज्ञानेश्वर सावळे, प्रविण बिरादार,पतंजली योग समिती एस.टी.काॅलनी चे अध्यक्ष श्रीकांत स्वामी, विजय बैले, सुहास केंद्रे, शिवलिंग मठपती, शिवलिंग कडोळे, आवले आदी उपस्थित होते.प्रमुख अतिथींचे हस्ते महामानव भारत रत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना आनंद हुरदळे म्हणाले की, बाबासाहेबानी सलग18 तास ग्रंथालयात ग्रंथाचे वाचन करुन ज्ञान आत्मसात केले व या ज्ञानाचा उपयोग समाजातील वंचीत घटकाच्या कल्याणासाठी केला. बाबासाहेबांचा पुस्तके वाचून ज्ञान आत्मसात करण्याचा आदर्श विद्यार्थ्यानी घाव्या असे आवाहन आनंद हुरदळे यांनी केले,संतोष स्वामी म्हणाले की, बाबासाहेबांनी शिका संघटीत व्हा आणी संघर्ष करा हा मुलमंत्र अंगिकारावा असे सांगून बाबासाहेब हे सामाजीक बदलाचे प्रणेते होते त्यांनी जगात श्रेष्ठ अशा भारतीय राज्य घटनेची निर्मीती केली असे विचार मांडले ,वसंत गोखले म्हणाले की, स्वातंत्र्य समता बंधुत्वाच्या मुल्यांना चालना दिली देशातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळवून देण्यासाठीचे कार्य भारतीय समाज कधीच विसरु शकणार नाही असे विचार व्यक्त केले ग्रा.प. सदस्य जितेंद्र बोडके,विजय बैले यांनी बाबासाहेबांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकणारे विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन वाचनालयाचे सचिव राम मोतीपवळे तर आभार शिवलिंग मठपती यांनी मानले.कार्यक्रमास बाल वाचक उपस्थित होते.

    वाचनालयाच्या वतीने शालेय परिक्षा संपल्याने ऊन्हाळी सुट्टी मध्ये मुलामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून अधिक पुस्तक वाचनार्‍या वाचकास प्रमाणपत्र व बक्षीस तसेच वाचलेल्या पुस्तकावर पुस्तक परिचय (भाषण) करणार्‍या बाल वाचकास पारितोषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.--संगीता मोतीपवळे