काळजी घ्या करोनाचा धोका वाढतोय! एका दिवसात आढळले तब्बल 'इतके' रुग्ण


अनिकेत मशिदकर मालेगाव प्रतिनिधी

    भारतात करोनाने (Corona) पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. देशात गेल्या 24 तासांत 7 हजार 830 नव्या करोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आता सक्रिय रुग्णांची संख्या 40 हजार 215 वर पोहोचली आहे.. या आधी देशात 5 हजार 880 रुग्णांची नोंद झाली होती. मागील आठवड्यात करोना रुग्णसंख्येत 79 टक्के वाढ दिसून आली. गेल्या आठवड्यात एकूण 36 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात मंगळवारी करोनाचे 919 नवे रुग्ण आढळून आले तर एकाचा मृत्यू झाला यात मुंबईतील 242, नागपुरातील 105, पुणे 58, नवी मुंबईतील 57 रुग्णांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.. नाशिक जिल्ह्यात काल २३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली असून काल ३२ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. यात नाशिक मनपात ११, नाशिक ग्रामीण, ०७, मालेगावमध्ये ०२ आणि ०३ जिल्हाबाह्य रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात एकूण 77 रुग्ण उपचाराखाली आहेत.

नाशिक जिल्ह्यात काल २३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली असून काल ३२ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. यात नाशिक मनपात ११, नाशिक ग्रामीण, ०७, मालेगावमध्ये ०२ आणि ०३ जिल्हाबाह्य रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात एकूण 77 रुग्ण उपचाराखाली आहेत.