शिक्षक सेना पदाधिकारी तालुका शाखा कन्नड स्नेह मेळावा संपन्न



कन्नड तालुका शिक्षक सेना व जुनी पेन्शन हक्क लढा सेना तालुका शाखा कन्नड यांचा पदाधिकारी परिचय व सत्कार स्नेह मेळावा कार्यक्रम दि. 19/02/2023  रोजी राजुरेश्वर लॉन्स कन्नड या ठिकाणी संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व शिक्षक सेना कन्नड संस्थापक अध्यक्ष कै. संजय जाधव जामडीकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना तालुका शाखा कन्नड नूतन पदाधिकारी तसेच जुनी पेन्शन हक्क लढा सेना नूतन पदाधिकारी यांचा परिचय व सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष दीपक पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून कन्नड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री शेषराव गंडे साहेब,ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री सुर्यभान दवंगे सर, शिक्षक सेना जिल्हा उपाध्यक्ष कल्याण पवार, ईश्वर पवार, शिक्षक सेना संभाजीनगर तालुका अध्यक्ष सचिन वाघ,केंद्रप्रमुख  श्री सोनाजी चव्हाण, भिकन वनारसे,के.आर.सपकाळ, ईश्वर वैष्णव, मालपूरे सर, दत्तात्रय पवार,दिलीप गायकवाड,ईश्वर महाजन, सतिश चेंडके तसेच केंद्रीय मुख्याध्यापक  श्री तुकाराम हार्दे,आर.जे.सोळूंके,कल्याणकर सर, गाडेकर सर, मधुकर बावीस्कर, जे.बी.माळी, योगेश पाटील, दिपक सोनवणे, त्याचप्रमाणे प्रशाला मुख्याध्यापक श्री अविनाश पाटील, जाधव सर,दिलीप महाजन माध्यमिक विभागाचे  लाला नागरे,राजीव जाधव इ.उपस्थित होते.

सदर मेळावा प्रसंगी व्ही.एम.पाटील, पी.एम.पवार,संजय जोशी,अमृत सोमवंशी, एम. पी. चव्हाण, गोपाल फिरके,ईश्वर कोटवाळे,प्रविणकुमार भदाने संदिप पाटील,प्रविण वाघ,एस.के.चव्हाण,पी के वाघ,लक्ष्मण गवळी, प्रकाश सोनवणे, संदीप महाजन,विनोद मोरे,संदिप राजपूत यांच्या सह शिक्षक सेना पदाधिकारी,मार्गदर्शक जेष्ठ सैनिक(सर्वांची नावे टाकणं शक्य नाही क्षमस्व) मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक सेना तालुका अध्यक्ष श्री दिलीप मगर यांनी केले.उपस्थित नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना ग.शि.अ.श्री गंडे साहेब,शि.वि.अ.श्री दवंगे साहेब,कें.प्र.श्री ईश्वर वैष्णव सर,कें.मु.अ.श्री तुकाराम हार्दे सर,शि.से.जि.उपाध्यक्ष श्री कल्याण पवार सर, श्री विनोद मोरे सर, शि.सेना संभाजीनगर तालुका अध्यक्ष सचिन वाघ सर यांनी मार्गदर्शन केले.शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष दिपक पवार सर यांनी *शिक्षक सेना काल आज आणि उदया* या विषयावर पदाधिकारी यांना संबोधित करुन संघटनेची भविष्यकालीन दिशा व वाटचाल, तसेच शिक्षक, विदयार्थी व समाज हिताच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पदाधिकारी मेळावा प्रसंगी नियोजन समिती,सत्कार समिती,व भोजन समिती सदस्य व उपस्थित शिक्षक सेना ता.शाखा व जूनी पेंशन हक्क लढ़ा सेनेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक सेनेचे जेष्ठ मार्गदर्शक बांधवांचे मनःपुर्वक धन्यवाद व आभार.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शि.सेना ता.संघटक श्री संदिप बोर्डे यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री संजय जोशी सर यांनी मानले. अशी माहिती श्री रावसाहेब पगार सर यांनी दिली