कंधार प्रतिनिधी :-- मारोती जिनके
तालुक्यातील मौजे कंधारेवाडी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 28 एप्रिल ते 5 मे दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहातील सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान समस्त गावकरी मंडळी कंधारेवाडी यांनी केले आहे.
कंधार तालुक्यातील मौजे कंधारेवाडी येथे 28 एप्रिल पासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होणार आहे .सकाळी 6ते 9 ज्ञानेश्वरी पारायण ,11 ते 1 गाथा भजन ,दुपारी 2 ते 3 रामायण वाचन, 4 ते 5 प्रवचन व सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ आणि रात्री 9 ते 11 हरिकीर्तन होणार आहे तसेच रात्री 12 ते 4 हरीजागर व पहाटे 4 ते 6 काकडा आरती असा दैनंदिन कार्यक्रम होणार आहे. 28 एप्रिल रोजी ह.भ.प. तुळशीराम महाराज गिरे ,29 एप्रिल ह.भ.प.तुकाराम महाराज साखरे मांडवीकर, 30 एप्रिल ह.भ.प. व्यंकट महाराज दगडवाडीकर ,1 मे रोजी ह.भ. प. मोहन महाराज खुर्दळीकर ,2 मे रोजी ह.भ.प.काशिनाथ महाराज नगरवाडिकर, 3 मे रोजी ह.भ. प. विजयानंद महाराज सुपेकर, 4 मे रोजी ह.भ.प गणेशानंद महाराज परळीकर व त्याच दिवशी नर्सिंग जयंती निमित्त बाबु महाराज स्वामी यांचे सायंकाळी चार ते सहा कीर्तन होईल. 5 मे रोजी शुक्रवार ह.भ.प. भागवताचार्य निरंजन भाईजी महाराज वसुरकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
यावेळी गायनाचार्य वैजनाथ आप्पा मंडलिकर,रामदास गुरुजी वाईकर पैसा ,ठाकरे सर बोधडी, पांचाळ सर बोधडी ,किशनराव मंगनाळे ,गोपीनाथ केंद्रे, सखाराम बोरीकर ,भास्कर महाराज घागर दरेकर ,व तसेच पंचक्रोशीतील गायनाचार्य बाबू महाराज कंधारेवाडी , पंडित मोरे पानशेवडी ,गोविंद गीते वंजारवाडी ,राजू मुंडे कंधारेवाडी, आदि मृदंगाचार्य, फुलवळ आंबुलगा मुंडेवाडी दिग्रस पानभोशी, गौळ, सांगूचीवाडी , गोलेगाव , तळ्याची वाडी ,संगमवाडी , घागरदरा, बोधडी, शेल्लाळी , कागनेवाडी, सोमसवाडी, टोकवाडी इत्यादी गावची भजनी उपस्थित राहणार आहेत .
या सप्ताहाची सांगता महाप्रसादाने होणार आहे .
महाप्रसादाचे अन्नदाते *बालाजी संतराम पल्लेवाड इंडियन आर्मी व गजानन मुरहारी गोटमवाड नाशिक पोलीस हे देणार आहेत.*