सटाणा/आकाश साळुंके
पालघर जिल्ह्यातील धानीवरी ता.डहाणू येथील आदिवासी समाजावर जो अन्याय झाला त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करून न्याय मिळावा व त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी आदिवासी पारधी महासंघ चे जिल्हा अध्यक्ष आकाश साळुंके व भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष राकेश घोडे यांनी सटाणा पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे व नायब तहसिलदार बी.जे.बहिरम यांच्याकडे केली आहे
मौजे-धानिवरी, ता. डहाणू, जि. पालघर येथील आमच्या पीडित आदिवासींना, त्यांच्या घरांचा मोबदला न देता, बेघरकरून त्यांच्यावर अमानुष अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई होवून त्यांना न्याय मिळावा व 15 दिवसात न्याय न मिळाल्यास सटाणा येथे उपोषण करन्यात येईल दि.१९/४/२०२३ रोजी मौजे-धानिवरी, ता. डहाणू, जि.पालघर येथे सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी डहाणू यांनी (मुंबई-वडोदरा राजमार्ग) यांच्या आदेशाने,पोलिस प्रशासने आदिवासी परीवारांवर अमानुष असा अन्याय-अत्याचार करून, त्यांना बेघर करण्यात आले आहे. याचे चित्रीकरण पूर्ण भारत देशाने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे. हे पाहून काळीज अक्षरशः पिळवटून येते. गरीब, अज्ञानी आदिवासी समाज पिढ्यानपिढ्या जमिनी कसत आलेला आहे.
अजूनही कसतोय परंतु त्याच्या अशिक्षित-अडाणी पणामुळे पणामुळे,त्यांची जमीन त्यांना नावावर करून घेता आली नाही किंवा महसूल प्रशासनानेही स्वतःहून सहकार्याची भावना दाखविली नाही. अशातच त्या जमिनीवरून मुंबई-वडोदरा राजमार्ग जात असल्याने, शेठ, सावकार जागे होवून जाणून बुजून कायद्यावर बोट ठेवून, आदिवासींना त्रास देवू लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धानिवरी गावात घर,झाडे यांचा मोबदला न मिळाल्याने व जोपर्यंत आम्हाला मोबदला देणार नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाहीत असा पवित्रा तेथील पीडित स्थानिक आमच्या आदिवासी बांधवांनी घेतल्यामुळे, पोलिस प्रशासनाने जबरदस्तीने वयोवृध्द महिला, शाळकरी मुले यांना खेचत घराबाहेर काढले, तसेच जबरदस्तीने त्यांच्या घरावरील कौले उतरविण्याचा जो भयंकर प्रकार समोर आल्याने, अक्षरशः या देशात लोकशाही आहे की तानाशाही, ठोकशाही आहे हेच समजायला मार्ग राहिला नाही. या घटनेने मानवजातीला काळीमा फासला गेला आहे.आपल्या देशात लोकशाही मृत स्वरुपात आहे की काय? असे क्षणिक वाटू लागले आहे.
सदर घटनेचा निषेध करू तितका कमीच आहे.तरी शासन-प्रशासनाने संबंधितांवर कार्यवाही करून, आमच्या आदिवासी बांधवांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आमचा संपूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बसणार नाही हे ध्यानी असावे व 15 दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास उपोषण करण्यात येईल अशा इशारा देण्यात आला आहे निवेदनावर भाजपा सरचिटणीस दिलीप खैरनार,सोशियल मीडिया प्रमुख गौरव चंद्रात्रे ,तालुका उपाध्यक्ष देवेंद्र पवार ,चिटणीस भास्कर पगार,संघटन सचिव रवी शिंदे ,शहर उपाध्यक्ष संजय पाठक ,सरपंच परिषद अध्यक्ष संदीप पवार, मा.सरपंच सुनील जाधव, माजी सैनिक भामरे यांच्या स्वाक्षरी आहेत.