माजी आमदार संजय कदम यांनी घडविला "आपला माणूस"चा प्रत्यय....


सुर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी

     मतांसाठी हवेत विरणारी आश्वासन....पूर्ण न होणार्या आणाबाका...प्रचार सभेत हात जोडून मी हे करेण, ते करेण....असे राजकारणी नेहमीच पाहवयास मिळतात मात्र, प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन समेजसेवा करणारे अपवादच असतात.  खेड-मंडणगड-दापोली विधान सभेचे माजी आमदार संजय कदम यांनी आपल्या कारच्या मागील काचेवर लिहिलेल्या "आपला माणूस" या दोण शब्दांचा जणू प्रत्ययच जनतेला घडवीला.

     संजय कदम हे आपल्या कारने खेडहून दापोलीकडे जात मार्गावर नारगोली येथे रस्त्याच्या कडेला दोन अपघातग्रस्त दुचाकीस्वार जखमी अवस्थेत पडलेले दिसले. तात्काळ गाडी थांबवून कदम खाली उतरले. अपघातग्रस्त दोघेहि बेशुद्ध असल्याचे कळताच रुनवाहिकेला संपर्क केला. मात्र, रुग्नवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होणार हे लक्षात येताच त्यांनी एका जखमीला आपल्या कारमध्ये घेवून चालकास दवाखान्यात जावयास सांगितले तर दुसर्या जखमीस त्यांनी स्वतः रिक्षातून दवाखान्यात घेवून गेले.

     मागे पुढे कार्यकर्त्याचा ताफा आणी गाडीची काच खाली करत हात दाखवणारे आमदार, खासदार नेहमीच पहावयास मिळतात मात्र, संजय कदमांसारखा आपला माणूस आपवादच ठरतात. त्यांच्या या कृतीमुळे संपूर्ण मतदारसंघासह जिल्हाभरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे.