खेड तालुका जुनी पेन्शन संघटनाध्यक्षपदी पवन पवार तर सचिव पदी गणेश सानप यांची निवड



सुर्यकांत बडबे खेड  प्रतिनिधी

     महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा खेड या कार्यकारणीची नुकतीच पुनर्गठन सभा डॉ.  बाबासाहेब आंबेडकर भवन खेड या ठिकाणी रविवार दि. १६ रोजी संपन्न झाली. या सभेत खेड तालुका जुनी पेन्शन संघटनेच्या अध्यक्षपदी श्री पवन पवार यांची तर सचिव पदी श्री गणेश सानप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.  

        जुनी पेन्शन संघटना जिल्हा रत्नागिरीचे अध्यक्ष श्री अंकुश चांगण जिल्हा कार्याध्यक्ष श्री राहुल तुगावकर, श्री. दत्तात्रय क्षीरसागर, श्री. बालाजी दराडे, श्री. ईश्वर तागड आदिंच्या उपस्थितीय खेड तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये कार्याध्यक्ष श्री. आशिष उतेकर, कोषाध्यक्ष श्री. रामराव लवटे, उपाध्यक्ष श्री. मंगेश झावरे यांची एकमताने निवड करण्यात आली. 

        यावेळी सर्व शिक्षक बांधवांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.