सतीश कोळी,खुलताबाद शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र शिक्षक पॅनल MSP हा व्हाँटस्अप गेल्या १२/१३ वर्षापासून शिक्षक,विद्यार्थी यांच्या हितासाठी दरवर्षी शैक्षणिक संमेलन आयोजित करत असतो.यामध्ये जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांचा विकासावर भर देण्यात येतो.गेल्या अनेक वर्षापासून या टीचे प्रमुख दिपक चामे लातूर),सतीश कोळी (खुलताबाद),रंगनाथ सगर(देवणी),गिरीष दारुंटे(मनमाड),सतीश बोरखडे(दारव्हा),विकी ऐलमटे(देवणी),भगवान जायभावे(जालना),मकरंद आहेर(पुणे)यासह ज्ञानेश्वर देवरे(शिर्डी), वेरोनिका गायकवाड(राहता)सह सर्व जिल्ह्यातील सर्व प्रमुख सदस्य यासाठी प्रयत्न करत असतात.शेगाव,खुलताबाद,लातूर,यवतमाळ, छत्रपती संभाजी नगर,पुणे आदी ठिकाणी,तंत्रज्ञान संमेलन,शिक्षक आमदार, मराठी सिनेअभिनेत्री,सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते शिक्षक पुरस्कार सोहळा,शिक्षणाची वारी,तंत्रज्ञानावर आधारित चर्चासत्रे आयोजित केली आहेत.यावर्षीही येत्या २३ व २४ मे सन २०२३ रोजी शिर्डी येथे एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे, तो म्हणजे २३ मे रोजी तंत्रज्ञान संमेलन होणार असून त्यात तंत्रज्ञानाचे महागुरू संदीप गुंड,बालाजी जाधव,भुषण कुलकर्णी हे तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित शिक्षकांना तंत्रज्ञानावर आधारित माहिती करून देणार आहेत.तसेच दि.२४ मे रोजी महाराष्ट्रातील शिक्षक वर्गातील शिक्षक कवींच्या स्वरचित कविता आँनलाईन मागवून ६५० कवितांपैकी २५ उत्कृष्ट कविता निवडून त्या कवितांचे वाचन त्या कवींकडून करण्यात येणार आहे. व त्या सर्व निवडक कवींना महाराष्ट्र तील नावाजलेले कवी अनंत राऊत, नारायण पुरी यांच्या हस्ते हार,शाल,मानपत्र, मोमेंन्टो,देऊन गौरविण्यात येणार आहे. हे संमेलन शिर्डीत सिल्वर ओक लाँन्स वाँटरपार्क समोर याठिकाणी आयोजित केले आहे. महाराष्ट्र तील शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र शिक्षक पँनल MSP टीमकडून करण्यात आले आहे.
अंतिम २५ विजेते कवींची निवड केलेले कवी खालीलप्रमाणे आहेत. बाळकृष्ण पांडुरंग खोत कागल जि. कोल्हापूरसविता संदीप जगताप मनपा शाळा गोवंडी मुंबई,नवनाथ विष्णू गाडेकर,आंबेगाव जि पुणे,गणेश रघुनाथ राऊत,जामनेर जि जळगाव,पुंडलिक कनिराम पवार संग्रामपूर बुलढाणा,योगेश संभाजी बेहेरे,शिंदखेडा,जि.धुळे ,सोमनाथ अरविंद जाधव,कोल्हापूर,जयश्री महेंद्र पवार,मिरा भाईंदर, ठाणे.देवयानी शशिकांत म्हंकाळे,राहाता, जि.अहमदनगर,शांताराम विलास,तराळ,शिराळा,जि.सांगली, इंगुळकर निलम राम कराड,जि.सातारा, स्वाती खंडेराव जाधव बागलाण जि-नाशिक ,दिपक भाऊसाहेब चव्हाण संभाजीनगर, मनिषा मारोतराव पिंगळकर, जि.परभणी,विजया सुरेश कोळी पंढरपूर जि. सोलापूर,प्रकाश बापूरावजी बनसोड,आर्वी जि-वर्धा, स्नेहल संजीव भोर, झित्राईमळा(चाकण), पुणे,नम्रता नितीन कोदे, माहिम मुंबई,उज्वला नरेंद्र इंगळे अकोला सर्व अंतिम विजेत्यांचे महाराष्ट्र शिक्षक पॅनल परिवारातर्फे २४ तारखेला गौरविण्यात येणार आहे.