सटाणा प्रतिनिधी | आकाश साळुंके
तालुक्यातील नामपूर येथे मलबरी बुश इंटरनॅशनल स्कूल यांनी एक अनोखा उपक्रम राबवत अक्षय तृतीया च्या शुभ मुहूर्तावर दि. 22 व 23 रोजी घर घर जिजाऊ, हर घर जिजाऊ या उद्देशाने सिलंबम शिवकालीन युद्धकला या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात दोन दिवसीय महिला व मुलींसाठी शिवकालीन विविध युध्दकला व शस्त्र यांचे मोफत प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते.
या प्रशिक्षणात मुलींना तलवारबाजी, लाठी काठी, दांडपट्टा, सुरुल ,डबल काठी, डबल तलवार चालवणे व स्वसंरक्षण करणे ( सेल्फ डिफेन्स) याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी नाशिक जिल्ह्याचे सचिव श्री. नागेश बनसोडे व त्यांची पूर्ण टीम यांनी उत्तम रित्या सर्व प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण दिले. मलबेरी बुश इंटरनॅशनल स्कूल च्या संचालिका मोतलिंग यांनी या प्रशिक्षणा चे आयोजन केले होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले तसेच सागर आहिरे यांचे सहकार्य लाभले