सोमनाथ पवार कन्नड संभाजीनगर
: निपाणी (ता. कन्नड) येथील मारुती मंदिरासमोर गुरूवार (१३ एप्रिल) पासून स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अवकाळी पाऊस व गारपीटमुळे रब्बी पिकांचे नुकसान झालेल्या परिसरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेपर्यंत बेमुदत सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या हातातोडांशी आलेला घास या गारपीटीने हिरावला आहे. चापानेर व देवगांव रंगारी महसूल मंडळातील गावात पाहणीवेळी जागेवरच मदतीची अपेक्षा असताना फक्त आश्वासने मिळत आहे. कन्नड तालुक्यातील जेहुर, औराळा परिसरातील जेहुर, निपाणी, औराळा, तांदुळवाडी, मुंगसापूर चिंचखेडा, गव्हाली, पळसखेडासह तालुक्यातील इतर ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीट मुळे गहू ,बाजरी, ज्वारी, कांदा, कांदाबिजवण , मका, सूर्यफूल भाजीपाला व फळ पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक नुकसान भरपाई जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सत्याग्रह आंदोलन मागे घेण्यात येणार नाही असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र कार्यकारिणीचे सदस्य कृषीभूषण भाऊसाहेब थोरात यांनी सांगितले.
या सत्याग्रह आंदोलनात जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे, औराळ्याचे माजी सरपंच चंद्रकांत देशमुख, तालुका अध्यक्ष प्रकाश बोरसे, दिनकर पवार, सचिन गायके, सुदाम जगताप, राजू बोंगाने, निसार पठाण, रामेश्वर भुसारे, पुंडलिकराव बोरसे, बळीराम बोरसे, साहेबराव बोरसे, उपसरपंच प्रतापराव सूर्यवंशी, आप्पासाहेब कदम, पंचायत समितीचे उपसभापती सूनील निकम
भाऊसाहेब निकम, सरपंच पंढरीनाथ कदम, पोलीस पाटील रावसाहेब निकम राजाराम बोरसे दत्तात्रय निकम अशोकराव निकम रुस्तम पाटील बोरसे साहेबराव बोरसे, राजाराम बोरसे विश्वासराव बोरसे दत्तू कदम आदी सह शेतकरी या सत्याग्रह आंदोलनात सहभागी आहेत. सत्याग्रह आंदोलन ठिकाणी मंडळ अधिकारी आबा पाटील देवगाव रंगारी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी भेट दिली आहे.