शासकीय कलावंत मानधन योजना समिती जिल्हा सदस्य पदी श्री रविंद्र महाराज दहिवेलकर यांची नियुक्ती




































वृद्ध साहित्यिक ,कलावंत मानधन योजनेसाठी जिल्हास्तरीय समिती गठन करण्यात आली असून जिल्हा समिती सदस्य पदी श्री ह भ प रवींद्र महाराज दहिवलकर यांची निवड करण्यात आली आहे. पालकमत्री तथा ग्राम विकास मंत्री श्री गिरीश महाजन यांच्या आदेशाने ही निवड करण्यात आली. सदर समितीत जिल्हास्तरीय साहित्यिक ,कला क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवर यांची अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच 5 ते 6ज्येष्ठ कलावंतांची पालकमंत्री यांच्या मार्फत नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या शिफारशीनुसार अध्यक्षपदासाठी गायक पारिजात चव्हाण, उपाध्यक्ष पदासाठी शाहीर वाणी, सदस्य पदासाठी श्री रवींद्र महाराज दहीवलकर यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व सदस्यांचे पालकमंत्री गिरीश महाजन, श्री बाबासो सुभाष भामरे, भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, आ.जयकुमार रावल, पिंपळनेर मंडल अध्यक्ष श्री इंजि.मोहन सूर्यवंशी, श्री सतीश तात्या महाले, व दहिवेल चे माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रवीण देसले, भाजपा शहराध्यक्ष श्री सुनील माळी, एस के बापू, भाजपा किसान मोर्चा उपाध्यक्ष श्री संजय कालेश्वर बच्छाव, श्री रावसाहेब खैरनार, आदी मान्यवरांनी श्री रविंद्र महाराज यांचे कौतुक केले.