जयंती म्हणजे वैचारिक व सांस्कृतिक वारसा जपणारा उत्सव- बाबासाहेब वाघमारे.


अहमदपूर : भिमराव कांबळे

तालुक्यातील कोपरा येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न बोधीसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त सकाळच्या सत्रात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून पंचशील ध्वजारोहण करून सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शेट्टिबा शृंगारे होते. पंचशील ध्वजारोहण किनगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांच्या हस्ते करण्यात आले, प्रमुख वक्ते म्हणून प्रा डॉ शंकर वाघमारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पॅथर नेते सुप्रियभाऊ बनसोडे, विद्रोही कवी राजेंद्र कांबळे , गोपीनाथ जोंधळे, उत्तम कांबळे , रमेश लेडेगांवकर ,धम्मानंद कांबळे , राहुल तलवार , हेमंत गुळवे, माधव बनसोडे ,संपादक संजय माकेगांवकर ,पञकार पंडितराव बोडके , त्रिशरण मोहगांवकर , संजिवकुमार देवनाळे ,असलम शेख , गोरख भुसाळे , सय्यद तोसिफ ,बालाजी गायकवाड , अन्वर बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब वाघमारे यांनी महापुरुषांच्या जयंती ह्या वैचारिक व सांस्कृतिक ठेवा असून तो जपला पाहिजे आणि भावी पिढीकडे सोपवला पाहिजे असे विचार व्यक्त करून बाबासाहेबांचे कार्य व त्यांचे विचार हे जगासमोर दीपस्तंभाप्रमाणे असून ते मानवाच्या कल्याणासाठी व देशहितासाठी उपयोगी आहेत असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार स्वागताध्यक्ष प्रा बालाजी आचार्य यांनी केले. 

तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती समितीचे अध्यक्ष अप्पाराव आचार्य, बाळासाहेब आचार्य, बाबुराव लांडगे, सुधाकर वाघबिजे, विश्वनाथ आचार्य ,प्रज्वल आचार्य, सचिन आचार्य ,मंगेश बनसोडे, शंकर गायकवाड, जगन्नाथ आचार्य, ज्ञानोबा आचार्य ,गिरीधारी बनसोडे, संदेश आचार्य, बाबासाहेब आचार्य,श्रीधर बनसोडे,कांचनदास आचार्य आदींनी परिश्रम घेतले.