गुरुवर्य ग. रा. चिकणे गुरुजी प्रतिष्ठानचे क्रीडा क्षेत्रातील कार्य वाखणण्याजोगेच- आमदार योगेश कदम यांचे गौरवोद्गार



सुर्यकांत बडबे खेड (रत्नागिरी ) प्रतिनिधी

        समाजात वंचीत घटक म्हणून समजल्या जाणार्या दिव्यांगातील अंगीभूत क्रीडा क्षेत्रातील कलागुणांना उभारी मिळावी यासाठी त्यांच्या राज्यस्तरीय तेहि कबड्डी सारख्या मैदानी स्पर्धेचे आयोजन करणे हे वाखणण्याजोगेच असल्याचे गौरवोद्गार खेड-मंडणगड-दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी काढले.

    ते शहरातील किशोरजी कानडे क्रीडांगण येथे गुरुवर्य श्री.ग.रा चिकणे गुरुजी प्रतिष्ठान खेड व दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने पॕरा कबड्डी असोसिएशन तालुका कबड्डी असोसिएशन व पंचमंडळ यांच्यावतीने आयोजित  राज्यस्तरीय दिव्यांग पुरुष कबड्डी स्पर्धा 2023 च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॕड. संदेश चिकणे, उपाध्यक्ष सतिश चिकणे यांचे विशेष अभिनंदन करत सहभागी सर्व संघ आणी खेळाडूंना आमदार कदम यांनी शुभेच्छा दिल्या.

      या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव,  उपविभागीय पोलीस अधिकारी शाशिकांत काशीद, शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, दिनेश यादव अध्यक्ष महा पॕरा कबड्डी असोसिएशन व सचिव संजय भोसकर तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत उपाध्यक्ष आईनकर इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  कृष्णा चिकणे यांनी केले. स्पर्धेत नागपूर, वर्धा, यवतमाळ, सांगली, अकोला, रायगड, रत्नागिरी अ व रत्नागिरी ब असे संघ सहभागी झाले आहेत ही कोकणातील पहिली दिव्यांग कबडी स्पर्धा आहे